पुराव्यावर आधारित पोषण-विशिष्ट उपचारांना प्रिस्क्रिप्शनच्या आधी जीवनशैली आधारित रोग व्यवस्थापनासाठी पहिले प्राधान्य म्हणून प्रोत्साहन द्या.



आरोग्य सेवेचे लक्ष्य अधिक प्रतिबंधात्मक दृष्टीकोन आणि पोषण, जीवनशैलीबाबत प्राथमिक  दृष्टीकोन याकडे वळवण्याची तातडीची गरज आहे कारण भारतावर एनसीडीचा भार आहे आणि सध्या ६६% असंसर्गजन्य रोग आहेत.

फिजिशियन असोसिएशन फॉर न्यूट्रिशन इंडिया (पॅन इंडिया) ही जागतिक एनजीओ पॅन इंटरनॅशनलची भारतीय शाखा आहे, जी पोषणाला आरोग्य सेवा प्रणालीचा मुख्य भाग बनवून जागतिक स्तरावर आहार-संबंधित मृत्यूंना समाप्त करण्याच्या मोहिमेवर आहे. 

पॅन इंडिया ने पाच वर्षात २५००० डॉक्टरांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ज्यामुळे २५०-५०० दशलक्ष लोकांच्या खाण्याच्या सवयींवर परिणाम होईल. सध्या, ३००० हून अधिक आरोग्य सेवा व्यावसायिक पॅन इंडियाशी निगडीत आहेत आणि त्यांनी त्यांचा वैद्यकीय सराव सुरू केला आहे व त्याचा दृष्टिकोन लागू करण्यात आला आहे आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. 

मुंबई: ४ फेब्रुवारी: फिजिशियन असोसिएशन फॉर न्यूट्रिशन इंडिया (पॅन इंडिया) ने ४ फेब्रुवारी रोजी जेडब्ल्यू मॅरियट, जुहू (मुंबई) येथे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये पुरावा आधारित पोषण (EBN) च्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या डॉक्टरांसाठी ११ व्या आरोग्य शिक्षण परिषदेचे आयोजन केले होते.

आयोजित परिषदेमध्ये संपूर्ण भारतातून वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्रातील लोकांचा सक्रिय सहभाग होता. लवचिकता वाढवण्यासाठी, पोषण-संबंधित मृत्यू कमी करण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणाच्या प्रयत्नांमध्ये योगदान देण्यासाठी भागीदार संस्थांसोबत सहकार्य करणे हा कार्यक्रमाचा उद्देश्य आहे.  

कार्यक्रमादरम्यान, डॉक्टर आणि आरोग्य व्यावसायिकांनी उच्चरक्तदाब, मधुमेह इत्यादी सारख्या जीवनशैलीतील आजारांवर नियंत्रण आणि पूर्ववत करण्यासाठी पुराव्यावर आधारित पोषण उपचारांची अंमलबजावणी करण्याच्या भूमिकेवर चर्चा केली. या कार्यक्रमाचा उद्देश वैद्यकीय व्यावसायिकांना समन्वित दृष्टीकोन स्वीकारण्याबाबत जागरूकता आणणे आणि प्रशिक्षण देणे हा होता. रोगाकडे पाहण्याचा सर्वांगीण दृष्टीकोन ज्यामध्ये केवळ गोळ्या लिहून देणेच नाही तर जीवनशैली आणि पौष्टिक सेवनातील बदलांद्वारे प्रतिबंध करणे देखील समाविष्ट आहे. 

मुंबईतील परिषदेला मुंबईतील टॉप डॉक्टर्स डॉ. रुपा शहा, डॉ. शारंग वर्तिकर आणि ॲम्बेसेडर डॉ. माधवी कठपाल आणि डॉ. अजॉय प्रभू यांनी संबोधित केले. श्रुती शर्मा, प्रोग्राम मॅनेजर, पॅन इंडिया, यांनी इतर राज्यांमध्ये आणि AIIMS जोधपूर, AIIMS नागपूर, AIIMS बिलासपूर आणि  बंगळुरू, कोईम्बतूर, म्हैसूर, जळगाव आणि भरतपूरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये पॅनच्या प्रभावर प्रकाश टाकला. 

डॉ. रजिना शाहीन, वैद्यकीय संचालक, पॅन इंडिया, म्हणाल्या, “आरोग्य सेवेसाठी अधिक प्रतिबंधात्मक दृष्टीकोन आणि पोषण किंवा जीवनशैलीवर प्राथमिक लक्ष केंद्रित करण्याची गंभीर गरज आहे, कारण भारतात असंसर्गजन्य रोगांचा (NCDs) मोठा भार आहे. सध्या विकसित पाश्चात्य जगाच्या विपरीत ६६% मृत्यू गैर-संसर्गजन्य रोगांमुळे होतो. भारतातील असंसर्गजन्य रोग (NCDs) अगदी लहान वयात त्रस्त आहेत, भारतीय लोकसंख्येपैकी २/३  युवा लोकसंख्या असंसर्गजन्य आजारांनी ग्रस्त आहेत, यात २६-५९ वयोगटातील प्रमाण जास्त आहे, हे वय जीवनातील सर्वात उत्पादक वर्षे मानली जातात.  

त्या पुढे म्हणाल्या, “रुग्णालयाच्या सद्य यंत्रणेत आम्ही एवढ्या मोठ्या भाराचा सामना करू शकणार नाही. भारताला विज्ञान आणि पुराव्यांवर आधारित शाश्वत आरोग्य सेवा प्रणालीची गरज आहे. पोषण विज्ञानातील अलीकडील प्रगतीचा फायदा घेऊन आरोग्य प्रणालींमध्ये पोषण-विशिष्ट घटकांचे एकत्रीकरण सुलभ करणे हे पॅन इंडियाचे ध्येय आहे. क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये पोषण हस्तक्षेप सुलभ करण्यासाठी प्रक्रिया, क्लिनिकल मार्गदर्शक तत्त्वे, साधने आणि संसाधने पुढे आणण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आमचे ध्येय आहे. पहिल्या काही वर्षांमध्ये आम्ही पुराव्यावर आधारित पोषणाबाबत डॉक्टरांना प्रशिक्षण आणि सक्षम बनवण्यावर भर देत आहोत. 

डॉ. रूपा शाह, वैद्यकीय सल्लागार, पॅन इंडिया, म्हणाले, “वैद्यकीय डॉक्टरांमध्ये निरोगी वनस्पती-आधारित अन्न आणि सक्रिय जीवनशैलीच्या सामर्थ्याबद्दल जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे. आता आरोग्य सेवा व्यावसायिकांनी प्रिस्क्रिप्शनच्या पलीकडे एक पाऊल पुढे जाऊन विचार करण्याची वेळ आली आहे. जीवनशैलीशी संबंधित आजार रोखणे हे त्याचे व्यवस्थापन करण्यापेक्षा खूप सोपे आहे. 

डॉ शारंग वर्तिकर, सल्लागार, पॅन, म्हणाले, “लोकसंख्येद्वारे वनस्पती-आधारित आहाराच्या सवयींचा व्यापक अवलंब केल्याने केवळ मानवांचेच नव्हे तर आपल्या ग्रहाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. जंगलतोड, सागरी ऱ्हास आणि प्रजाती नष्ट होण्याचे मूळ कारण पशुशेती आहे. वनस्पती-आधारित आहारावर अवलंबून राहिल्यास मानवी वापरासाठी जमीन, अन्न आणि पाणी मोठ्या प्रमाणात मोकळे होईल. आणि जर आपल्या सध्याच्या पिढीने हा बदल केला नाही तर भविष्यातील पिढ्यांना याबद्दल उपाययोजना करण्यास खूप उशीर होऊ शकतो.  

पॅन इंडियाच्या पॅनेलच्या सदस्य, डॉ. रुपिंदर कौर मुरजानी, स्वत: कॅन्सर पासून बचावलेल्या रुग्ण असून त्यांनी आपला अनुभव सामायिक केला, “अनेक वर्षे कर्करोगाशी लढा दिल्याने माझ्या शरीरावर परिणाम झाला, माझी हाडे ठिसूळ झाली आणि माझ्या खेळाडू क्षमतेच्या आकांक्षा भंग पावल्या. अगणित पूरक आहार आणि आहाराचा प्रयोग केल्यानंतर, एका प्रशिक्षकाकडून एक सूचना आली ज्यामुळे सर्व काही बदलले. हळूहळू वनस्पती-आधारित आहाराचा अवलंब केल्यानंतर आणि डिटॉक्सिफायिंग प्रक्रियेचा अवलंब केल्यामुळे, मला स्वतःमध्ये एक चमत्कारिक बदल दिसला. आता अंगात दुखणे नाही की सूजही नाही. डाळिंब, क्रॅनबेरी आणि संत्र्याचा रस हे माझे सकाळचे अमृत बनले आहेत, जे मला आतून पोषण देतात. माझ्या केमो उपचारांदरम्यान कॅलरीजची कमतरता असलेला आहार हा माझा सतत साथीदार आहे. 

डॉ. रोहित मोदी, डॉ. माधवई कठपाल आणि डॉ. अजॉय प्रभू यांनीही रुग्णांसोबतचे अनुभव आणि पॅन मिशनच्या अनुषंगाने त्यांची मते मांडली. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेतकरी आत्महत्येचे पाप सरकारच्या माथी * वडेट्टीवार यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल*