कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई सरकारने द्यावी* *विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली मागणी*


नागपूर - केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांवर आघात झाला आहे.त्यामुळे सरकारने याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करावा, अन्यथा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. 

   

गारपीट अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. जवळपास पीक फळबाग यांचा नुकसान झालं आहे. त्यातही महत्त्वाचे कांदा  हे पीकाच्या निर्यातीवर बंदी आणली आहे. सरकारने१५ ऑगस्ट पर्यंत अनुदान देण्याची घोषणा करूनही अद्याप त्याबाबत कोणतीही मदत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिली नाही.

 निर्यात बंदी झाल्यावर कांद्याचा भाव १२०० ते १५०० रुपये खाली घसरला आहे. यामुळे शेतकऱ्यांच उत्पादन खर्चही वाया गेलं आहे. अनेक राजकीय पक्ष ल, नेते उत्स्फूर्तपणे आंदोलनात उतरले आहेत.सरकारने

ल केंद्र सरकारकडे निर्यात बंदी बाबत भूमिका मांडली पाहिजे. 

 सरकारने कांदा निर्यात बंदीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अन्यथा 

प्रति अडीच हजार क्विंटल कांद्याचे झालेल्या नुकसानाची सरकारने स्वतः जबाबदारी घेऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. 

   त्यावर सरकारकडून उत्तर देण्यात आले की २५ ते ३० टक्के कांदयाची देशात कमतरता आहे. शेतकरी जर कांद्यामुळे संकटात येत असेल तर  केंद्र सरकार कांदा खरेदी करायला तयार आहे अशी माहिती देण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेतकरी आत्महत्येचे पाप सरकारच्या माथी * वडेट्टीवार यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल*